मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. तेव्हापासून एनसीबीच्या रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. आता बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक करन जोहरच्या संबंधितांना एनसीबीने समन्स बजावला आहे. त्यामुळे करण जोहर देखील एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असून त्याला चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.
आज बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी तपास करताना बऱ्याच कलाकारांची नावे समोर आली आहेत. ६७A कलमाअंतर्गत एनसीबीने काहींना समन्स बजावला आहे. यामध्ये काही धर्मा प्रोडक्शन आणि करण जोहरच्या संबंधित लोक आहेत. माहितीनुसार लवकरच करण जोहरला देखील समन्स बजावून त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यापूर्वी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबीने दुसऱ्यांदा समन्स बजावला होता. पण अर्जुन रामपालने एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी २२ डिसेंबरपर्यंतची वेळ मागितली आहे.
दरम्यान करन जोहरच्या एका पार्टीतील कलाकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. जुलै २०१९ मधील करन जोहरच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळेसच्या व्हिडिओमधील कलाकार नशेत असल्याचा दाव केला जात होता. पण हे सत्य नसल्याचे करन जोहरने वारंवार स्पष्ट केले होते.