गुहागर : लग्न म्हटले की, घरात उत्साह, धामधूम असते. आनंदाचं वातावरण होतं. मात्र गुहागरमध्ये लग्नाच्या बरोबर 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं आणि ही धक्कादायक माहिती कळाली.
अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या 15 दिवसांनंतर ती 5 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब गुहागरमध्ये समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंब हादरून गेलं आहे. मुलाच्या घरच्यांनी गुहागर पोलिसात तक्रार दाखल केलीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लग्न झालेली अल्पवयीन मुलगी गुहागरमधील मासू गावची असल्याची माहिती आहे. सदर मुलीचं चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावातल्या मुलाशी काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. पीडित मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं असतं ती 5 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मुलाच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीवर लग्नाआधी कोणी लैंगिक अत्याचार केले होते का, या अनुषंगानेही पोलीस तपास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.