नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर याने आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर पुढे बघू, असे विधान अख्तरनं केलं आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. शोएबचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारताविरोधात विष ओकणारा अख्तर हा पहिला क्रिकेटपटू नाही. याआधी देखील शाहिद आफ्रिदी, जावेद मियांदाद यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनी भारताविरोधात वादग्रस्त वक्त्यव्य केली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिलेल्या एका मुलाखतीत शोएब ‘गजवा-ए-हिंद’बद्दल बोलताना दिसत आहे. ‘गजवा-ए-हिंद’चा अर्थ ‘भारताविरोधात पवित्र युद्ध’ असा होतो. ‘आमच्या पवित्र पुस्तकात ‘गजवा-ए-हिंद’चा उल्लेख आहे. नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे,’ असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे.
नंतर याबद्दल वाचन करावं असं तुम्हाला वाटतं का?, असा प्रश्न टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेनं अख्तरला विचारला होता. त्यावर शोएब ‘हो, म्हणाला त्यानंतर तिथून शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर फत्ते करून पुढे मार्गक्रमण करू,’ असं उत्तर शोएबने मुलाखतीत दिलं. शोएबचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी शोएबच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.