अहमदाबाद : ‘ड्रॅगन’ हे फळ तुम्हाला माहीत असेलच… पण गुजरातमध्ये मात्र हे फळ ‘ड्रॅगन’ नावानं नाही तर ‘कमलम’ नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ‘ड्रॅगन’ फळाचं नाव बदलून ‘कमलम’ करण्याचा निर्णय जाहीर केलाय. ड्रॅगन हे नाव चीनी असल्याने त्याच नाव बदलण्यात येणार आहे. थोडक्यात फळाच्या नावातही ‘राजकारण’ केले जात आहे.
गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, ‘ड्रॅगन’ या फळाचा आकार कमळासारखा असल्यानं त्याचं नाव बदलून ‘कमलम’ करण्यात आलाय. संस्कृत भाषेत ‘कमलम’चा अर्थ कमळाचं फूल असा होतो. नुकतंच हे फळ भारतात लोकप्रिय झालंय. अनेक ठिकाणी बाजारात हे फळ सहजगत्या उपलब्धही होतं. उष्णकटीबंधातील हे फळ आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखलं जातंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही वर्षांत गुजरातच्या कच्छ आणि नवसारी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फळाचं उत्पादन घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जुलै २०२० रोजी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात या फळाचा उल्लेख केला होता. तसंच गुजरातमध्ये भाजप कार्यायलयाचं नावही ‘कमलम’ आहे.
भारतात गेल्या काही वर्षांत शहर, इमारती, वस्तू यांच्या नावांत बदल करण्याचा जोरदार ट्रेन्ड पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेश आणि हैदराबाद हा ट्रेन्ड पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारकडून अनेक राज्यांची तसंच रेल्वे स्टेशन्सच्या नावांत बदल करण्यात आला. आता भाजपशासित गुजरातमध्ये फळाचंही नवं नामकरण करण्यात आलंय.