नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळ्या रस्त्यांवर लावल्या आहेत.त्यामुळे इथून येणाऱ्या शेतक-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
टिकारी सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी सीसीची भिंत ( सिमेंट ब्लॉक ) यापूर्वीच इथे बांधली गेली होती. बॅरिकेडिंगचे सात थर लावण्यात आले होते. पण आता रस्ता खोदून तिथे त्यामध्ये लांब खिळे आणि टोकदार सळया बसवण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी इथे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सीमेवर रोड रोलर देखील आणण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी रस्त्यावर हे रोड रोलर उभारले जाऊ शकतात. इथल्या बऱ्याच थरांची सुरक्षा सीमेवर होती.
दिल्लीत २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. यात आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले करण्यात आले. तसंच तोडफोड केली गेली. या पार्श्वभूमीवर सरकारने आता शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तासह मोठ्या प्रमाणात बरिकेड्स लावण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यानंतर टिकरी कला गावापर्यंत ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची भिंत उभारली गेली. दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमेवर सीसीची भिंत बनवली होती. ही भिंत चार फूट जाड आहे. यापासून १० पावलांवर दिल्लीकडे जाणार्या एमसीडी टोलजवळ सीमेवर एक रस्ता खोदण्यात आला आहे आणि सिमेंटमध्ये लोखंडी टोकदार खिळे बसवण्यात आले आहेत. यासह येथे लोखंडी अणुकुचीदार सळया बसवण्यात आल्या आहेत. जेणेकरुन येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही. इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
शेतकऱ्यांनी इथून दिल्लीत ट्रॅक्टरने घुसण्याचा प्रयत्न केला तर ते पंक्चर होईल. संपूर्ण टायर खराब होईल. येथून बाहेर पडणं कठीण होईल. आधीच सीमेवर सुरक्षा दलाच्या १५ कंपन्या तैनात आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसक घटनांनंतर येथे दररोज सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. यातच आता लोखंडी खिळे बसवण्यात आले आहेत.