नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं होतं. रिहानानंतर एकेकाळी पॉर्नस्टार म्हणून काम केलेल्या मिया खलिफानं शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. मिया खिलफानं शेतकरी आंदोनाला पाठिंबा देत एक पोस्ट केली आहे. तिनं शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर केला आहे.
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सत्तर दिवसापासून सुरु आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे.
मिया खलिफा एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेली आहे. तिचे जगभरात कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटरवर तिचे अनेक लाखो चाहते आहेत. मिया खलिफानं ऑक्टोबर 2014 मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. मिया जन्मानं कॅथॉलिक आहे पण तिचा धर्मावर विश्वास नाही. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2016 मध्ये मिया खलिफा सर्वाधिक लोकप्रिय पॉर्नस्टार होती. मिया खलिफानं स्पोर्टसं कॉमेंटेटर आणि मॉडेल म्हणून देखील काम केलेले आहे. पॉर्नस्टार होण्यापूर्वी मिया एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. मिया खलिफाला आंतकवाद्यांकडून धमकी देखील मिळाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिया खलिफानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधील फोटोवर शेतकऱ्यांना मारणं बंद करा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पोस्टरवर शेतकरी आंदोलनावेळी दिल्लीमधील इंटरनेट बंद करण्यात आलं हे दिल्लीत काय चाललं आहे, असा सवाल तीन केला आहे. त्याशिवाय मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाच्या समर्थना्र्थ ट्विट देखील केली आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मिया खलिफानं दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये मिया खलिफानं कोणत्या मानवधिकारांचं उल्लंघन होत आहे? त्यांनी नवी दिल्लीच्या परिसरातील इंटरनेट बंद केलं आहे? #farmerprotest तर दुसऱ्या ट्विटमध्ये Paid Actors, huh? पुरस्कार द्यायच्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोंबत उभी आहे, असही मिया खलिफा म्हणते.
जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.