नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने आता देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या ट्विटनंतर खळबळ उडाली आहे. यात बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड’ असं चित्र निर्माण झाले आहे.
आता अक्षय कुमारनेही या वादात उडी घेतली आहे. ही बाब इतकी वाढली आहे की आज परराष्ट्र मंत्रालयाने यावर अशा लोकांना सल्लावजा इशारा दिला आहे. अक्षय कुमार यांनी ट्विट करुन परराष्ट्र मंत्रालयाला पाठिंबा दर्शविला आहे. अक्षय कुमार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटलंय की जे लोक प्रकरणाला बिघडवू पाहत आहे, त्यांच्यापासून दूर राहावे.
हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर शेतकरी आंदोलनाला आता आणखीनच हवा मिळाली आहे. रिहाना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने तिच्यावर टीका केली आहे. कंगनाच्या मदतीला एकीकडे अजय देवगन आणि अक्षकुमार धावून आलेले असतानाच तर ऐकेकाळची पॉर्नस्टार मिया खलिफा आणि ग्रेटा थनबर्गने रिहानाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बॉलिवूड विरुद्ध हॉलिवूड असं चित्रं निर्माण झालं आहे. दोन्ही इंडस्ट्रीमधील कलाकार का आमनेसामने आले आहेत?
अभिनेता अक्षय कुमारने आज ट्विटरवर लिहलंय की, “शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा.”
शेतकरी आंदोलनाला संदर्भात परदेशात बसलेल्या काही शक्ती अजेंडा चालवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या विषयांवर कोणतेही मत देण्यापूर्वी, संपूर्ण माहिती मिळवणे चांगले. अर्धवट माहितीवर सोशल मीडियावर व्यक्त केलेल मत हे बेजबाबदार असल्याचा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालय ट्विटरवर #Indiatogether #IndiaAgainstPropoganda हॅशटॅग प्रमोट करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या विधानानंतर आज अनेक स्टार त्याचे समर्थन करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात काय म्हटले आहे? “या विरोधाला भारताची लोकशाही नीतिमूल्ये आणि राजकारणाच्या संदर्भातून पाहिले पाहिजे. सरकार आणि संबंधित शेतकरी संघटना या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा बाबींवर भाष्य करण्यापूर्वी, आपण वस्तुस्थिती शोधून घ्यावी आणि मुद्द्यांविषयी योग्य ते समजून घ्यावे अशी आमची विनंती आहे. खळबळजनक सोशल मीडिया हॅशटॅग आणि टिप्पण्यांचे आमिष, विशेषत: सेलिब्रिटीज लोकांनी करणे योग्य नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
* ‘तू खाली बस, ते शेतकरी नव्हे दहशतवादी आहेत’, कंगनाचा रिहानावर निशाला
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रसिध्द पॉपस्टार रिहानावर अभिनेत्री कंगना राणावतने निशाणा साधला. ‘या आंदोलनाबाबत कोणीही बोलत नाही. कारण ते शेतकरी नसून दहशतवादी आहेत; जे भारताचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरुन चीन आपल्या असुरक्षित तुटलेल्या देशाचा ताबा घेईल आणि अमेरिकेप्रमाणेच चिनी वसाहत बनवेल. तू मूर्ख आहेस, खाली बस. आम्ही तुझ्या डमीसारखे आपले राष्ट्र विकत नाही’, असे कंगनाने म्हटले.
* ग्रेटा थनबर्गचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाला बाहेरील देशातूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यातच आता पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा असल्याचं तिने म्हटलं. दरम्यान, गेली 70 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
* मिया खलिफा काय म्हणतीय
मिया खलिफानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधील फोटोवर शेतकऱ्यांना मारणं बंद करा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पोस्टरवर शेतकरी आंदोलनावेळी दिल्लीमधील इंटरनेट बंद करण्यात आलं हे दिल्लीत काय चाललं आहे, असा सवाल तीन केला आहे. त्याशिवाय मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाच्या समर्थना्र्थ ट्विट देखील केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये मिया खलिफानं कोणत्या मानवधिकारांचं उल्लंघन होत आहे? त्यांनी नवी दिल्लीच्या परिसरातील इंटरनेट बंदल केलं आहे? #farmerprotest तर दुसऱ्या ट्विटमध्ये Paid Actors, huh? पुरस्कार द्यायच्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोंबत उभी आहे, असही मिया खलिफा म्हणते.