पुणे : श्री राम मंदिरासाठी मुस्लीम संघटनेने देऊ केलेला सव्वा लाखांचा निधी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी आज नाकारला. “माझ्याकडे अनेक मुस्लिम संघटनांनी यापूर्वी निधी सुपूर्द केला आहे. पण ही रक्कम रोख स्वरूपात असल्याने त्याचा हिशोब ठेवणं अडचणीचं होतं. त्यामुळे मी फक्त धनादेश स्वीकारतो” असे स्पष्टीकरणही गोविंदगिरी महाराजांनी यावेळी दिले. ते पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आले होते.
नवचैतन्य प्रकाशन आणि माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत जोशी यांनी लिहलेल्या एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विश्वधर्मी विश्वनाथतत्त्व या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष डॉ. गोविददेवगिरी महाराज , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ.विजय भटकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, शिवाजी महाराज मोरे, एस.एन.पठाण, एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, मंगेश कराड आदी उपस्थित होते. यावेळी इंडियन मुस्लीम इन्टलेक्चुअल फोरम तर्फे राम मंदिराच्या निर्माणसाठी सव्वा लाखांचा निधी दान करण्यात आला. दरम्यान, यापूर्वी देखील राममंदिर निर्माणासाठी अनेक मुस्लीम संघटनांतर्फे निधी दान करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातील विविध संघटनांचा समावेश आहे.
या निधीची रक्कम इंडियन मुस्लिम इंटलेक्च्युअल फोरमचे एस.एन.पठाण यांच्या हस्ते गोविंद गिरी महाराज यांना सुपूर्द करण्यात आली. पण ही सगळी रक्कम रोख स्वरूपात असल्यामुळे ती रक्कम गोविंद महाराज यांनी तातडीने विश्वनाथ कराड यांच्याकडे परत केली. “माझ्याकडे अनेक मुस्लिम संघटनांनी यापूर्वी निधी सुपूर्द केला आहे. ही पहिलीच वेळ नाही. पण ही रक्कम रोख स्वरूपात असल्यास त्याचा हिशोब ठेवणं अडचणीचं होत आहे. त्यामुळे आतापर्यंत मी फक्त धनादेश स्वीकारलेले आहेत ” असे स्पष्टीकरण देखील गोविंदगिरी महाराजांनी यावेळी दिले.