सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल चार युवकांना जीव गमवावा लागला आहे. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणची ही दुर्घटना आहे. यात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या भागातील आहे. अपघातग्रस्त स्विफ्ट गाडी कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.
पुणे-बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील वहागाव या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल चार युवकांना जीव गमवावा लागला आहे. हे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या भागातील असल्याचं समोर आलेले आहे. अपघातग्रस्त वाहन स्विफ्ट गाडी असून या गाडीमध्ये एकूण पाचजण सिंधुदुर्ग ते मुंबई असा प्रवास करत होते. ही स्विफ्ट गाडी कराड सोडून पुढे आल्यानंतर तळबीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर ती कठडा ओलांडून विरूद्ध दिशेला गेली आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* स्पीडोमीटरची पोलिसांनी घेतली नोंद
या अपघातात निलेश मोडकर, मनोज परब, अंकुश शिंदे, भरत बोडकर या चौघांचा जागीचा मृत्यू झाला तर रोशन वरद हा थोडक्यात वाचला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार ही मुंबईच्या दिशेने जात असताना तिचा वेग हा जवळपास 160 असल्याचे स्पीडोमीटरच्या फोटो वरून दिसत आहे. ज्या वेळेला हा अपघात झाला त्या वेळेला स्पीडोमीटरही बंद पडले. या स्पीडोमीटरची नोंद पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान करून घेतलेली आहे. वहागावच्या वळणावरून जाताना गाडीचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून विरूद्ध दिशेतून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांवर आदळली.
* महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा
हा अपघात एवढा भीषण होता की या मृत झालेल्या चौघांच्या शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे झाले होते. अपघाताचे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहत होता. जखमीला कराड शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांचे शवविच्छेदन करण्यासाठी शवागृहात नेण्यात आले आहे. आज रविवार असल्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा होत्या. त्यात हा अपघात झाल्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.