जकार्ता : एका देशात चक्क रस्त्यावरुन रक्ताच्या रंगाचे पाट वाहत असल्याचे दिसतंय. तेथील स्थानिकांसाठी असे रंगीत पाणी साचणे, शहरातील रंगीत पाणी दिसणे नवीन नाही. मागील महिन्यातही पूर आल्यामुळे उत्तर भागातील गावात हिरव्या रंगाचे पाणी सगळीकडे दिसून आले होते. एका ट्विटर युजरने सांगितले की, रस्त्यावरील खड्डेदेखील वेगवेगळ्या रंगाने रंगलेले असल्याचे दिसून येते.
त्या देशाचे नाव इंडोनेशिया आहे. या देशातील एका गावातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोत गावातील रस्त्यांवर रक्ताचे पाट वाहत असल्याचे दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. अखेर थोड्या वेळाने या फोटोमागील सत्य समोर आले.
ट्विटरवर हजारो लोकांनी सेंट्रल जावाच्या पेकलोंगन शहरातील एका गावाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी त्याला हे रक्त दिसत असल्याचे सांगितले. मात्र, हा रंग एका डाईंग कारखान्यातील लाल रंग पाण्यात मिसळला गेला. पावसामुळे हा रंग आणखी फिक्कट झाला असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. पेंकलोंगन शहर हे पारंपरिक पद्धतीने रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या डाईंग तंत्रात वापरण्यात येणाऱ्या बाटीक उत्पादनासाठी ओळखले जाते. यामध्ये कपड्यांवर पॅटर्न बनवले जाते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ट्विटरवर हजारो लोकांनी सेंट्रल जावाच्या पेकलोंगन शहरातील एका गावाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी त्याला हे रक्त दिसत असल्याचे सांगितले. मात्र, हा रंग एका डाईंग कारखान्यातील लाल रंग पाण्यात मिसळला गेला. पावसामुळे हा रंग आणखी फिक्कट झाला असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. पेंकलोंगन शहर हे पारंपरिक पद्धतीने रंगासाठी वापरण्यात येणाऱ्या डाईंग तंत्रात वापरण्यात येणाऱ्या बाटीक उत्पादनासाठी ओळखले जाते. यामध्ये कपड्यांवर पॅटर्न बनवले जाते.
सोशल मीडियावर लोकांनी या फोटोबाबत चिंतादेखील व्यक्त केली. या फोटोंचा वापर चुकीची माहिती, अफवा पसरवण्यासाठी होऊ नये असे मत युजर्सने व्यक्त केले. अनेकदा अशाप्रकारच्या फोटोंचा वापर अफवा पसरवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी करण्यात येतो.