लातूर / इंदापूर : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर भिगवणजवळ ट्रॅक्टर आणि कारचा भीषण अपघात झाला. यात 3 जणांचा मृत्यू झाला. ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठिमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. ते टायरचे व्यापारी आहेत. रविवारी रात्री पुण्याहून लातूरला निघाले होते. पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा यात मृत्यू झाला.
सोलापूर-पुणे महामार्गावर भिगवण जवळ भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कारने ट्रॅक्टरला पाठीमागून दिलेल्या धडकेत लातुरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, एकाच कुटुंबातील तिघांच्या पार्थिवावर आज सोमवारी लातूर येथील स्मशानभूमीत त्या तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.
गीता अरूण माने (वय 36 ) मुकुंदराज अरुण माने वय ( वय 19 ) अरुण बाबुराव माने वय (45) सर्व हे मयत झाले आहेत. तर साक्षी अरुण माने (वय 18) आणि महादेव रखमाजी नेटके हे अपघातात जखमी झाले आहेत. मृत व जखमी हे एकाच कुटुंबातील आहेत. रविवारी (ता. 7 ) रात्री 12 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. भरधाव फॉर्च्युनर कार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीला पाठीमागून धडकली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर शहरातील माने टायर्सचे मालक अरुण बाबुराव माने हे पत्नी गीता, मुलगा मुकुंदराज, मुलगी साक्षी आणि चालक महादेव नेटके यांच्यासह फॉर्च्यूनर गाडीमधून (क्रमांक एम. एच. 24 एजे 2004) पुण्याला जात होते. सोलापूर-पुणे महामार्गावर भिगवण जवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये गीता माने आणि मुलगा मुकुंदराज माने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अरुण माने यांचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला. अपघातामध्ये त्यांची मुलगी साक्षी माने आणि चालक महादेव नेटके हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.