मुंबई : मुंबईत तरुणींना फसवून पॉर्न व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा उद्योजक नवरा या पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स करत असल्याचं समोर आलंय. उमेश कामत असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कामत हा देशातील एका बड्या उद्योजकाचा स्वीय सहाय्यक होता.
मुंबईत तरुणींना फसवून पॉर्न व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा उद्योजक नवरा या पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स करत असल्याचं समोर आलं आहे. येत्या काही दिवसात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेत्री गेहना वशिष्ठनंतर मुंबई पोलिसांनी उमेश कामत नावाच्या एका हायप्रोईल व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अभिनेत्रीचा उद्योजक पती या इंडस्ट्रीला पैसा पुरवत असल्याचं समजलं. दरम्यान या रॅकेटचं जाळं परदेशातही पसरल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
अभिनेत्री गेहना वशिष्ठ याआधी देखील अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. या प्रकरणात आता बॉलिवूड कनेक्शन देखील समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षात बॉलिवूडमधील अनेक निर्माते, दिग्दर्शक आणि सेलिब्रिटींना हजेरी लावावी लागू शकते.
* 15 मुलींची ब्लू फिल्म, HotMovies नावाची वेबसाईट
पैशांचे आमिष दाखवून तसंच वेब सीरिजमध्ये काम मिळवून देतो असं सांगून तब्बल 15 मुलींची ब्लू फिल्म बनवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने पर्दाफाश केला होता. आता या प्रकरणात नवनवी आणि धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसचा वापर करुन जबरदस्तीने पॉर्न फिल्म बनवल्याच्या आरोपा खाली अभिनेत्री गेहना वशिष्ठला मुंबई पोलिसांनी अटक केली.
गेहनाच्या अटकेनंतर तिच्या चौकशीतून आणखी एक मोठं नावं आलं आहे. उमेश कामत असं त्याचं नाव असून तो देशातील एका बड्या उद्योगजकाचा स्वीय सहाय्यक होता. पण काही कारणास्तव त्याची ती नोकरी गेली आणि उमेश या पॉर्नच्या धंद्यात शिरला. परदेशी अॅपला पॉर्न फिल्म विकून उमेश आणि गेहना कोट्यवधी रुपये कमावत होते. HotMovies नावाची वेबसाईट तयार करुन त्यावर या पॉर्न फिल्म विकल्या जात होत्या. तर उमेश त्याचे परदेशातील सोर्स वापरुन याच पॉर्न फिल्म जगभर विकत होता.