पुणे : पुणे- लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर एटीएमसमोर मारेकऱ्याने केलेल्या हल्ल्यात सचिन नानासाहेब शिंदे जागीच ठार झाला. आज सकाळी 11:30 च्या सुमारास सचिन एटीएमसमोर सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना दुचाकीवरून आलेल्या लोकांनी गोळीबार केला. डोक्यात गोळी लागून सचिन रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारेकरी दुचाकीने फरार झाले. सचिन हा गुन्हेगारी प्रवृतीचा होता आणि गोल्डमॅन म्हणूनही ओळखला जात होता.
पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे अॅक्सिस बँकेच्या समोर एका सराईत गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या सराईताचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन नाना शिंदे (वय २९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सचिन शिंदे हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तो लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेजवळ उभा होता. त्यावेळी अॅक्टिव्हावरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शिंदेवर गोळी झाडली. एक गोळी शिंदे याच्या मानेजवळ गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मानेजवळ गोळी लागली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पळून गेले आहेत. मयत हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.