मुंबई : सचिन, सेहवाग, लारा, ब्रेट ली या दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पुन्हा प्रारंभ होत आहे. २ ते २१ मार्च दरम्यान या मालिकेचे आयोजन केले जाईल. छत्तीसगडच्या रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह क्रिकेट स्टेडियममध्ये हे सर्व सामने होणार आहेत. ही सीरिज गेल्या वर्षी सुरू झाली होती, परंतु कोरोनामुळे ही स्थगित करण्यात आली होती. या स्पर्धेचे केवळ चार सामने खेळले गेले.
भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे एक ट्विट काही दिवसांपूर्वी चांगलेच व्हायरल झाले होते. पण आता सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सचिनने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर काही जणांनी सचिनवर टीकाही केली होती. पण याबाबत सचिनने आपले मत व्यक्त केलेले नाही. त्यानंतर सचिन आता पुन्हा मैदानात उतरणार आहे. पण सचिनचे हे सामने आयपीएलच्या लिलावानंतर होणार आहेत. आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या लिलावात सचिनचा मुलगा अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज २ ते २१ मार्च या कालावधी खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये सचिनबरोबर भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागही खेळणार आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशानसारखे महान खेळाडूही यावेळी आपल्याला खेळताना दिसणार आहेत. छत्तीसगढ येथील शहीद वीर नारायण सिंग आंतराराष्ट्रीय स्टेडियममध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत.
* रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज
रस्त्यावर बऱ्याच दुर्घटना होत असतात. त्याचबरोबर काही जणांना नियमही माहिती नसतात. या नियमांबाबत लोकांना जागृक करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजची सुरुवात झाली होती. पण करोना व्हायरसमुळे या सीरीजचे काही सामने रद्द करण्यात आले होते. आतापर्यंत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे चारच सामने खेळवले गेले आहेत. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.