नवी दिल्ली : देशांतर्गत विमानसेवा महागणार आहे. तिकीटदराच्या किंमतीत 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने किमान प्राईस बँडमध्ये 10 टक्के आणि कमाल प्राईस बँडमध्ये 30 टक्के वाढ केली आहे. एकदा विमानसेवा कोरोनाकाळाआधीच्या पूर्ववत स्थितीत आल्या, की प्राईस बँड कमी होईल अशी अपेक्षा असल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारकडून 25 में रोजी तिकिटांच्या किमती कायम ठेवण्यासाठी प्राईस कॅपिंग लावण्यात आली होती.
भारत सरकारनं देशांतर्गत विमानसेवांच्या तिकीटदरांवर किमान आणि कमाल प्राईस बँड वाढवला आहे. सरकारनं किमान प्राईस बँडमध्ये 10 टक्के आणि कमाल प्राईस बँडमध्ये 30 टक्के वाढ केली आहे.
मर्यादित उड्डाणामुळे तिकिटांच्या किमती कायम ठेवण्यासाठी देशांतर्गत फ्लाईटच्या ऑपरेटर्सवर प्राईस कॅपिंग लावण्यात आली होती. ही प्राईस कॅपिंग 25 मे रोजी लावण्यात आली होती. हा तो काळ होता, जेव्हा कोरोनानंतर दीर्घकाळ बंद असलेल्या विमानउड्डाणांना पुन्हा सुरू करण्यात आलं होतं.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी म्हटलं की, एकदा विमानसेवा कोरोनाकाळाआधीच्या पूर्ववत स्थितीत आल्या, की प्राईस बँड कमी होईल अशी अपेक्षा आहे. राज्यसभेत प्रश्नाची उत्तरं देताना मंत्री म्हणाले, की 23 मार्च 2020 रोजी नागरी विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. 25 मे रोजी हळूहळू टप्प्याटप्प्यानं एसओपीमध्ये जागा देत ती पुन्हा सुरू केली गेली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुरी यांनी हेसुद्धा सांगितलं, की आमचा प्रयत्न नेहमीच वर्तमान स्थितीतून पुढे जाण्याचा आहे. 80 टक्के क्षमतेनं विमान उड्डाणं अजून का सुरू झाली नाहीत? या प्रश्नावर ते म्हणाले, की हा विमान सेवांकडून कमर्शियल तत्वावर घेतला गेलेला निर्णय आहे.
* सरकारकडून फेअर लिमिट जाहीर
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विमान नियामक DGCA नं 21 मे रोजी या फेअर बँड्ससाठी सरकारकडून फेअर लिमिट जाहीर केली होती. याअंतर्गत 40 मिनिटांहून कमी वेळेच्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये 2000 रुपये आणि 6000 रुपयांची लोअर आणि अप्पर लिमिट आहे. यानुसार 40-60 मिनिटांसाठी 2500 रुपये आणि 7500, 60-90 मिनिटांसाठी 3000 आणि 9000 रुपये, 90-120 मिनिटांसाठी 3500 आणि 10000, 120-150 मिनिटांसाठी 4,500 आणि 13,000 रुपये, 150-180 मिनिटांसाठी 5500 आणि 15700 रुपये आणि 180 ते 210 मिनिटांसाठी 6500 आणि 18600 रुपये आहे रुपयांची लोअर आणि अप्पर लिमिट आहे.
180-210 मिनिटांच्या उड्डाणांवरचा अपर प्राईस बँड आता 18,600 रुपयांवरून 30 टक्के वाढून 24,200 रुपये होईल. सर्वात छोट्या मार्गावर किमान प्राईस बँडवर 10 टक्क्यांची वाढ होईल. म्हणजेच 200 रुपयांची ही वाढ असेल.