पंढरपूर : पंढरपूर – सांगोला रोडवरील ७ वा मैल कासेगावजवळ शुक्रवारी आज सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर बोलेरो जीप जावून धडकल्याने चारजणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्याचाही नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही माहिती तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. सर्व मृत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सखाराम धोंडीबा लांबोर (वय 50), श्यादूबाई लक्ष्मण लांबोर (वय 62), पिंकी ऊर्फ सुनीता ज्ञानू लांबोर (वय 11), नागूबाई काळू लांबोर (वय 62) व तुकाराम खंडू कदम (वय 50), असे मृतांची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मयतामध्ये एक पुरुष, दोन महिला, एका लहान मुलीचा समावेश आहे. एका गंभीर जखमीस उपचारासाठी पंढरपूर मधिल रुग्णालायात दाखल केले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पो नि किरण अवचर यांनी भेट दिली. अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करीत आहेत.
धोंडीबा बापू लांबोर (वय 87), कोंडदेवा बापू लांबोर (वय 7), कोमल बापू लांबोर (वय 7), बबन लांबोर (वय 45), भारती बापू लांबोर (वय 54), रोहित यशवंत कांबळे (वय 20), बापू काळअप्पा लांबोर (45), कोंडीबा विठ्ठल लांबोर (वय 5), काळूलाल लांबोर (वय 70), नागूबाई ज्ञानू कोकरे (वय 50), धोंडीबा सखाराम डोईफोडे (वय 60) हे जखमी झाले असून सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले.