सांगली : सांगली शहरातील हरभट रस्ता परिसरातील सराफ हरिश्चंद्र नारायण खेडेकर यांनी दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार 8 जणांवर फसवणूक, सावकारी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सर्व संशयितांचे त्यांचे पैसे तसेच सोन्याच्या देवाणघेवाणीची व्यवहार होते. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सुसाईड नोटमध्ये 8 जणांची नावे
आर्थिक व्यवहारातून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक झाली. याबाबत सांगली पोलिसात गुन्ह्याची नोंद होती. त्यानंतर खेडेकर (82) यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेतला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मधुकर खेडेकर, श्रीकांत खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार, सुनिल पंडित यांची नावे आहेत. त्याच्याविरुद्ध मृत खेडेकरांची मुलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहे.