नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली आहे. राणा यांना धमकीचे एक पत्र आले आहे. यात त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर आहे. या प्रकरणी राणा यांनी दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, राणा यांनी थेट शिवसेनेवर आरोप केला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची अज्ञाताने धमकी दिली आहे. या प्रकारमुळे खळबळ उडाली असून धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या धमकीच्या पत्रात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याचे नाव नाही. मात्र, या प्रकाराची दखल घेत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आपल्या तक्रारीत त्यांनी हे धमकीचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे.
मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यवर त्यांनी सरकारवर टीका करत या घटकांना न्याय देण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांना एक धमकीचे एक पत्र आले आहे. या पत्रात त्यांच्यावर अॅसीड फेकण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारची दखल घेत त्यांनी या दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, हे पत्र शिवसेनेच्या खऱ्या लेटरहेडवर असल्याची कोणतीही पुष्टी अजून झालेली नाही. असे असले तरी नवनीत राणा यांनी तक्रार केल्यानंतर शिवसेनेची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे आहे.