जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथील जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींच्या शोषणाप्रकरणी आसाराम आजीवन कारावास भोगत आहे. मंगळवारी आसारामने गुडघेदुखी आणि रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे सांगितले. आसाराम बापूची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच त्याचे भक्त रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी त्यांना बाहेर काढले.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तब्येत बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथील कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या आसारामला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आसाराम यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या केलेल्या लैंगिक शोषणाप्रकरणी आसाराम बापू आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जोधपूरच्या जेलमध्ये बंद असलेल्या आसाराम बापू यांची काल मंगळवारी तब्येत बिघडली. त्यांना तातडीने कारागृहातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, अधिक उपचारासाठी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
२०१३ मध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इंदोरमध्ये आसारामला अटक करण्यात आली होती. २०१८ मध्ये जोधपूर विशेष कोर्टाने त्याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.
प्राथमिक माहितीनुसार, आसारामना अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तुरुंगातील दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, एक तास उलटूनही फरक न पडल्यामुळे आसारामला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉक्टरांना आपल्याला त्रास होत असल्याचे सांगितले. माझ्या पायाचे गुडघे काम करत नाहीत. तसेच मला रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले.