पुणे : पुण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने मंगळवारीचं वर्तवली होती. आज गुरुवारी दुपार नंतर कात्रज सुखसागर नगर, गोकुळ नगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रस्ता परिसरात वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. त्यातच आता पुण्यासह नाशिक, धुळे, सोलापूर, नंदूरबार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.