नवी दिल्ली : आयपीएल २०२१ लिलाव सुरु झाली असून खेळाडूंच्या नावांची चर्चा सुरु आहे. यातही लिलावात सामिल झालेल्या १८ वर्षीय तरुणीची चर्चा होत आहे. केकेआर च्या ताफ्यात दिसणारी जान्हवी मेहता ही यंदाच्या आयपीएलमध्ये सहभाग घेतलेली सर्वात युवा सदस्य आहे. ती जूही चावला आणि जय मेहता यांची कन्या आहे. जान्हवीने शिक्षणात घवघवीत यश मिळवलेलं आहे. तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नसून लेखक व्हायचे आहे. आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये आज गुरुवारी पार पडला.
आयपीएलसाठी लिलाव प्रक्रिया पार पडत आहे. यात अनेकांची नजर मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरवर होती. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने खरेदी केले आहे. अर्जुनला मुंबईने २० लाखात खरेदी केले. दरम्यान, अर्जुन आता मुंबईकडून खेळताना दिसणार आहे.
आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये गुरुवारी पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस व भारताचा अनकॅपड प्लेअर कृष्णप्पा गौतम या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा झाली. मॉरिस आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून त्याला १६ कोटी २५ लाख रुपये मोजत राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले, तर कृष्णप्पा गौतमला ९ कोटी २५ लाख रुपये मोजत चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या लिलावात एकूण ५७ खेळाडूंवर बोली लागली. त्यात २२ खेळाडू हे परदेशी होते. या ५७ खेळाडूंवर तब्बल १४५ कोटी रुपये वेगवेगळ्या संघांनी खर्च केले.
काईल जॅमिन्सन या खेळाडूला १५ कोटी मोजत रॉयल चॅलेंजर संघाने आपल्याकडे घेतले तर ग्लेन मॅक्सवेलवर याही वर्षी संघ उदार होताना दिसले.
तब्बल १४ कोटी २५ लाख मोजत त्याला बेंगलोरने आपल्या संघात समाविष्ट केले. शाहरुख खान या भारतीय फलंदाजाला आश्चर्यकारकरित्या तब्बल ५ कोटी २५ लाख मिळाले. त्याची बेस प्राईज केवळ २० लाख होती.
* चेतेश्वर पुजारा ७ वर्षांनंतर खेळणार आयपीएल, चेन्नईने लावली बोली
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यात लिलाव चेतेश्वर पुजाराला ५० लाखांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले आहे. पुजारा गेल्या ७ सीझननंतर आयपीएलमध्ये खेळणार आहे.
* प्रिती झिंटाच्या संघाने विकत घेतला शाहरुख खान
युवा खेळाडू शाहरुख खान याला प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्स संघानं ५.२५ कोटी रुपये मोजले. त्याची २० लाख बेस प्राईज होती. तरीही त्याला एवढी मोठी बोली लागणे अपेक्षित होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेतील तामिळनाडूच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा आहे. त्यानं या स्पर्धेत २२० च्या स्ट्राईक रेटने तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, त्याचे नाव शाहरुख खान असले तरी तो रजनीकांत याचा जबरा फॅन आहे.
* आयपीएल २०२१ लिलावात सर्वाधिक महागडे ठरलेले खेळाडू
ख्रिस मॉरिस – १६ कोटी २५ लाख, राजस्थान
काईल जॅमिन्सन – १५ कोटी, बेंगलोर
ग्लेन मॅक्सवेल – १४ कोटी २५ लाख, बेंगलोर
झाय रिचर्डसन – १४ कोटी, पंजाब
कृष्णप्पा गौतम -९ कोटी २५ लाख, चेन्नई
रिले मेरिडिथ – ८ कोटी, पंजाब
मोईन अली – ७ कोटी, चेन्नई
शाहरुख खान – ५ कोटी २५ लाख, पंजाब
टॉम करन – ५ कोटी २४ लाख, दिल्ली
नॅथन कुल्टर नाईल – ५ कोटी, मुंबई
शिवम दुबे – ४ कोटी ४० लाख, राजस्थान
ऍडम मिल्ने – ३ कोटी २० लाख, मुंबई
शाकिब अल हसन- ३ कोटी २० लाख, कोलकाता
पियुष चावला – २ कोटी ४० लाख, मुंबई
स्टिवन स्मिथ – २ कोटी २० लाख, दिल्ली
दाविद मालान – १ कोटी ५० लाख, पंजाब
मिश्तफिझूर रहेमान -१ कोटी, राजस्थान
उमेश यादव – १ कोटी- दिल्ली