कोलकाता : भाजपच्या पामेला गोस्वामी या तरुण महिला नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला कारमधून ड्रग्सचा पुरवठा करत होती. पोलिसांनी पामेला हिच्यासह तिचा मित्र भाजप नेता प्रोबिर कुमार डे यालाही अटक केली आहे. कोलकाताच्या न्यू अलीपूर भागातून तिला अटक करण्यात आली. पोलिसांना तिच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचे कोकीन ड्रग्सही आढळून आले.
भारतीय जनता पार्टीच्या युवा महिला नेत्याला कोकेण हा अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये अटक करण्यात आली आहे. या महिलेला तिच्या कारमधील कोकेणसह पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पामेला गोस्वामी असं या भाजपाच्या महिला नेत्याचं नाव आहे. आज शुक्रवारी ती आपल्या कारमधून कोकेण घेऊ जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मित्र प्रोबीर कुमार डे हा देखील होता. त्यामुळे पोलिसांनी या दोघांवर अटकेची कारवाई केली आहे. कोलकात्यातील न्यू अलिपूर भागातील एनआर अव्हेन्यू येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी पोमेलाच्या कारमध्ये सुरक्षा रक्षकही होता.
कोकीनचा पुरवठा करण्यासाठी पामेला गोस्वामी एका विशिष्ट ठिकाणी जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानुसार पोलिसांनी तिचा पाठलाग करत तिची कार थांबवली. कार थांबवल्यानंतर पोलिसांनी तिची बॅग तपासली. यावेळी पोलिसांना तिच्या बॅगमध्ये आणि सीटवर कोकेन सापडल्याचे सांगितले जात आहे.