नवी दिल्ली : प्रायव्हसी पॉलिसीवरून झालेल्या वादानंतर व्हॉटस्अॅपने नव्या पॉलिसीसाठी कंबर कसली आहे. युजर्सला नवी पॉलिसी समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. तर ती स्वीकारण्यासाठी १५ मे २०२१ ही डेडलाइन देण्यात आली आहे. दरम्यान, वादग्रस्त पॉलिसीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून केवळ नवे स्वरूप दिले आहे. त्यामुळे १५ मे २०२१ पर्यंत या पॉलिसीला मंजूरी न दिल्यास तुमचे व्हॉट्सअप बंद होणार आहे.
प्रायव्हसी पाॅलिसीचे प्रकरण न्यायालयातही गेले आहे. मात्र, या एकूण घडामाेडींपासून व्हाॅट्सॲपने बाेध घेतला असून, वापरकर्त्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार काही बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. नव्या पाॅलिसीबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. नव्या पाॅलिसीबाबत केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. तसेच वैयक्तिक चॅटच्या गाेपनीयतेबाबतही कंपनीच्या धाेरणांची माहिती सरकारला दिल्याचे व्हाॅट्सॲपने स्पष्ट केल्याचे सांगितले आहे.
वादग्रस्त पाॅलिसीमध्ये काेणताही बदल करण्यात आलेली नसून केवळ नवे स्वरूप दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या प्रायव्हसी पाॅलिसीबाबत अनेक समज-गैरसमज पसरले. वापरकर्त्यांचे वैयक्तिक चॅट, बँक खात्यांची माहिती फेसबुकसाेबत शेअर करण्यात येणार असल्याचे पसरले. मात्र, कंपनीने त्याबाबत स्पष्टीकरण दिले असून, वैयक्तिक चॅट्स फेसबुकसाेबत शेअर करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. नवी पाॅलिसी स्वीकारण्यासाठी वापरकर्त्यांना १५ मे २०२१ पर्यंत मुदत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ॲपमध्ये चॅट टॅबवर वापरकर्त्यांना बॅनर दिसणार असून, त्यात ‘टॅप टू रिव्ह्यू’ बटन दिसणार आहे. तेथे क्लिक केल्यावर नवी पाॅलिसी वाचता येईल. वापरकर्त्यांना पाॅलिसी व्यवस्थितपणे समजल्यानंतरच ती स्वीकारण्याचा निर्णय घेता येईल, तसेच ॲपमध्ये स्टेटस हे लाेकप्रिय फीचरही कंपनी वापरत आहे. त्यातून काही ठळक मुद्दे वापरकर्त्यांपर्यंत पाेहाेचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
* जानेवारीत भारतात प्रचंड गदाराेळ
प्रायव्हसी पाॅलिसीवरून वाद निर्माण झाल्यानंतर आता व्हाॅटस्ॲपने नव्या पाॅलिसीच्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी संपूर्णपणे नव्या पद्धतीने माेहीम राबविण्यात येणार असून, वापरकर्त्यांना नवी पाॅलिसी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. मात्र, ती स्वीकारण्यासाठी १५ मे २०२१ ही डेडलाइन देण्यात आली आहे.
व्हाॅट्सॲपने जानेवारीमध्ये अचानक नवी प्रायव्हसी पाॅलिसी आणली. त्यावरून भारतात प्रचंड गदाराेळ झाला. अचानक करण्यात आलेल्या घाेषणेमुळे वापरकर्त्यांना माेठा धक्का बसला, तसेच ती मान्य करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंतच मुदत देण्यात आली हाेती. ती मान्य करा किंवा व्हाॅट्सॲप वापरणे बंद करा, हेच दाेन पर्याय वापरकर्त्यांसमाेर हाेते.