अमरावती : अमरावती शहरात उद्या संध्याकाळ सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. एक आठवड्यासाठी हा लॉकडाऊन आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्या म्हणाल्या. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व गोष्टी बंद राहणार आहेत.
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी ( 22 फेब्रुवारी) संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. विशेष म्हणजे राज्यात अनलॉकनंतर हा पहिलाच लॉकडाऊन असेल
“स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क मोठ्या प्रमाणात वापरण्याची गरज आहे. अंतर ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये जर कुणी आंदोलन करण्याचं किंवा राजकीय काही करायचं ठरवलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल”, असं त्यांनी सांगितलं.
“आम्ही सगळ्यांकडून मदत मागत आहोत. नगरसेवकांकडेही मदत मागितली आहे. अमरावती आणि अचलपूर महापालिका यांचीही मदत मागितली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
* 12 कंटेन्मेंट झोन घोषित
अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात 12 कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना 14 दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. या 12 प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला.
* अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा सर्वात मोठा हॉट स्पॉट ठरला आहे. 359 रुग्ण घेत आहेत, अशी माहिती उपचार उपविभागीय अधीकार्यांनी दिली. अचलपूर परतवाडाच्या घरोघरी रुग्ण आढळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून कामाला लागली असून खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आली आहे.