मुंबई : प्रसिध्द गायिका नेहा कक्करला थायरॉईड हा आजार आहे. याचा त्रासही तिला होत आहे. याचा खुलासा तिनेच केला आहे. ‘मी जीवनात खूप खूश आहे. करियरला चांगले दिवस आले आहेत. कुटुंबही चांगले आहे . पण थायरॉईड हा आजार खूप सतावत आहे. यामुळे एंग्जायटीचा त्रास होतो. भर स्टेजवर शरीर कधी कधी थरथर कापते’, असे नेहाने ‘इंडियन आइडल’च्या एका एपिसोडमध्ये सांगितले. नेहा ‘इंडियन आइडल’ शोमध्ये जज म्हणून काम करत आहे.
बॉलिवूड गायिका नेहा कक्करने नुकत्याच आपल्या आजारपणाबद्दल माहिती दिली आहे. एका रिऍलिटी शोच्या मंचावर भावूक होत नेहा कक्करने ही खास बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नेहा कक्करने आपल्याकडे प्रेम, चांगले कुटुंबीय, करिअर असं सगळं काही असताना एक खंत व्यक्त केली आहे. नेहाला एंग्जाइटी इश्यू असल्यामुळे त्याचा त्रास होत आहे. ‘इंडियन आयडल’ च्या मंचावर भावूक होत नेहाने ही खास बाब शेअर केली आहे.
नेहा कक्करने या दिवसांत गाण्याच्या लोकप्रिय रिऍलिटी शो असलेल्या ‘इंडियन आयडल 12 मध्ये जजची भूमिका साकारत आहे. या आठवड्यात आईवर स्पेशल एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. चंदीगडमधून आलेल्या अनुष्काने ‘लुका छुपी’ गाणं गायलं.
नेहा कक्कर हे गाणं ऐकून इमोशनल झाली आणि रडू लागली. गाणं ऐकून नेहा रडू लागली तेव्हा तिने सांगितलं की, अनुष्का प्रमाणे मलापण एंक्झायटीचा त्रास आहे.
नेहाच्या आजारपणाबद्दल ऐकल्यावर तिचे चाहते दुःखी झाले आहेत. नेहाने आपलं करिअर देखील एका रिऍलिटी शोमधूनच सुरू केलं आहे.
* प्रसिध्द कलाकारावर संकट, नेहा कक्कर रडली; केली 5 लाखांची मदत
‘इंडियन आइडल’च्या एका शोमध्ये ‘जिंदगी की ना टूटे लडी’, ‘एक प्यार का नगमा है’ आणि ‘मैं ना भूलूंगा’ या गाण्याचे प्रसिध्द गीतकार संतोष आनंद यांनी हजेरी लावली. पत्नी, मुलगा आणि सुनेच्या आत्महत्येनंतर संतोष आनंद एकटे पडले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या खूप हलाखीची झाली आहे. त्यांचे हे हाल पाहून गायिका नेहा कक्करला रडू कोसळले. दरम्यान, यावेळी नेहाने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली.