कोलकाता : केकची डिलीव्हरी करणाऱ्या तरूणाने ६६ महिलांवर बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील हा प्रकार आहे. विशाल शर्मा असं तरूणाचं नाव आहे. विशाल हा केक ऑर्डर करणाऱ्या महिलांना त्यांचा फिडबॅक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉल करायचा. यावेळी तो महिलांचे अश्लिल फोटो काढायचा. मग त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करायचा. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
देशात महिला अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये अशी एक धक्कादायक घटना घडली आहे जी वाचून तुम्हाला प्रचंड संताप येईल. पश्चिम बंगालमधील हूगली येथे दोन केक डिलिव्हरी बॉयने फिडबॅकच्या नावाखाली ६६ महिलांना जाळ्यात अडकवून त्यांच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हूगलीमधील त्रिकोण पार्कमध्ये राहणारा विशाल शर्मा आणि सुमन मंडल दोघेजण मिळून शहरातील एका मोठ्या केक डिलिव्हरीच्या कंपनीत काम करतात. केक डिलिव्हरी केल्यावर महिलांना गोड बोलून ते व्हिडिओ कॉल करत असे.
व्हिडिओ कॉल केल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बनवून महिलांना ब्लॅकमेल करायचे आणि जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करायचे. आतापर्यंत त्यांनी ६६ महिलांवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
चंदननगर भागातील चूचुडा पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी महिलांना आपल्या जाळ्यात ओढायची पध्दत पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत.दरम्यान या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिक करत आहेत.