मुंबई : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडिअम असलेल्या ‘सरदार पटेल स्टेडिअम’चे बुधवारी ‘नरेंद्र मोदी स्टेडिअम’ असं नामकरण करण्यात आलं. स्टेडिअमला नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला असून जोरदार टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तर नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “काय नेता मिळाला आहे देशाला. यांना लोक आपल्याला विसरुन जातील याची चिंता आहे. यांचा लोकांवर विश्वास नाही की, मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”.
दरम्यान उद्घाटनावेळी अमित शाह यांनी हा मोदींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यानेच देशाचे पंतप्रधान म्हणून स्टेडिअमला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगितलं. स्टेडिअममध्ये अणसाऱ्या दोन एण्डपैकी एकाचे नाव ”अदानी एण्ड’ आणि दुसऱ्याचं नाव ‘रिलायन्स एण्ड’ असं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावरन मोदी सरकारवर निशाणा साधत ‘हम दो हमारे दो’ धोरण उघड झाल्याचा टोला लगावला आहे.