श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ अनुसंधान संघटनेकडून (ISRO) PSLV-C51 च्या माध्यमातून 19 सॅटेलाईट लॉन्च करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च करण्यात आले. या अभियानांतर्गत ब्राझीलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइट देखील लॉन्च करण्यात आले. त्यासोबत अन्य 18 कमर्शियल सॅटेलाइट्ला प्रक्षेपित केले गेले.
नव्या वर्षात भारताने नवे मिशन हातात घेतले आहे. आज सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी 51ने एकूण 18 सॅटेलाइट लॉन्च केल्या आहेत. आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले आहेत. या उड्डाणाची काल शनिवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांपासूनच काऊंटडाऊन सुरू झालं होतं.
या अभियानांतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटलाही लॉन्च केलं आहे. विशेष म्हणजे इस्रोने या सॅटेलाइटसोबत भगवदगीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचं हे 53 वे मिशन आहे. चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटाहून हे सॅटेलाइट अंतराळात लॉन्च करण्यात आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताने आज अंतराळात पाठवलेल्या ॲमेझोनिया-१द्वारे पृथ्वीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. ॲमेझोनिया उपग्रह ब्राझिलने तयार केला असून लॉन्चिंग नंतर चीन आणि ब्राझिल त्याचं संयुक्तपणे संचालन करणार आहेत. या मिशनचा कालावधी तीन वर्षाचा आहे.
अमेझोनिया-1 द्वारे पृथ्वीवरील जंगल तोड आणि त्याचे निरीक्षण करतील. अमेझॉनच्या जंगलात नुकतीच आग लागली होती. त्यामुळे ब्राझिलचा हा उपग्रह जंगलाच्या संवर्धनासाठी संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या उपग्रहातून येणाऱ्या फोटोंमुळे वनस्पती आणि कृषी क्षेत्रालाही मदत मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
स्पेस किड्ज इंडियाने सतीश धवन सॅटेलाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे सॅटेलाइटसोबत मोदींचा फोटोही अंतराळात पृथ्वीभोवती फिरताना दिसणार आहे.