मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली. रिलायन्स समूहाचे मालक उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
‘जैश उल हिंद’ या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. मात्र कदाचित एखादी दहशतवादी संस्था चर्चेत येण्यासाठी हे करत असेल. आतापर्यंत तपासात असा कोणताही पुरावा याबाबत सापडलेला नाही, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
जैश उल हिंद संघटनेनं एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात संघटनेनं एसयूव्ही कारमध्ये स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुप घरी पोहोचले आहेत, असा दावा केला आहे. तसंच, हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे, असं म्हणत मुकेश अंबानी यांच्याकडून पैशांची मागणी केली आहे. जर अंबानींनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढच्या वेळी मुलाच्या कारवर हल्ला करु, अशी धमकीही दिली आहे.
‘तुम्हाला माहितीये की पुढं काय करायचं आहे. जे पैसे तुम्हाला द्यायला सांगितलेत ते ट्रान्सफर करा आणि तुमच्या ‘फॅट किड्स’सोबत आनंदात राहा,’ असंही या पत्रकात लिहलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या दोन वर्षापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत.
दरम्यान, गुरुवारी अँटेलियापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर विजय स्टोअरच्या समोरच्या पदपथावर एक हिरव्या रंगाची कार बेवारस स्थितीत आढळली. या कारबाबत सर्वप्रथम अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आला. याबाबतची माहिती मिळताच मुंबईचे सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एटीएस, बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे कारमध्ये जिलेटिनच्या सुमारे २५ ते ३० कांड्या सापडल्या. कारमध्ये एक पत्र सापडले असून यामध्ये ‘यह तो खाली ट्रेलर है’ अशा शब्दांत धमकी दिली आहे.
* पुन्हा मुकेश अंबानी टॉपवर
गेल्या दोन वर्षापासून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत.
ब्लूमबर्ग बिलियर्नस इंडेक्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. चीनच्या झॉग शनशानने या आठवड्यात २२ अब्ज डॉलर्स गमावल्यामुळे हा बदल झाला. झोंगच्या कंपनीला या आठवड्यात विक्रमी २० टक्के तोटा सहन करावा लागला.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियन्स इंडेक्सनुसार चीनच्या झोंग शनशान यांना मागे टाकत पहिले स्थान पटकवले आहे. झोंग यांच्या कंपनीला गेल्या आठवड्यात विक्रमी 20 टक्के तोटा झाला. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे 80 अब्ज डॉलर्स असून चीनचे झोंग शनशान यांची 76.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे. झोंग यांनी चीनमधीलच सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांना मागे टाकत आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती झाले होते.