नवी दिल्ली / मुंबई : मुंबईतील एकाच रेस्टॉरंटमधील 10 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अंधेरीच्या एसव्ही रोडवर असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव राधा कृष्ण असे आहे. या कर्मचाऱ्यांना बीकेसीच्या जम्बो कोव्हिड-19 सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या परिसरातील जवळपासच्या रेस्टॉरंटमधील तब्बल 35 कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. दरम्यान मुंबईत गुरुवारी (4 मार्च) 1 हजार 103 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन गाईडलाईन्स जारी केले आहेत. जुन्या काही नियमांना कायम ठेवत केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि रेस्तराँसाठीच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली. देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने लोकांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. शिवाय खबरदारी म्हणून सार्वसनिक ठिकाणांसाठी काही सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा राज्यांमध्ये एकूण 85 टक्के रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या राज्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
शॉपिंग मॉलसाठी गाईडलाईन्स
1. कोरोना नियमांचे पालन व्हावे यासाठी पुरेसे मनुष्यबळ असावं
2. कोरोनाचा धोका जास्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
3.अशा कर्मचाऱ्यांनी थेट लोकांच्या संपर्कात येऊ नये
4.कर्मचारी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळे एंट्री आणि एक्झीट असावी
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेस्तराँसाठी गाईडलाईन्स
1.पार्सल घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित करावं, फूट डिलिव्हरी करताना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे
2. होम डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य
3.पार्किंग किंवा अन्य ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खबरदार घ्यावी. शारीरिक अंतराचे पालन करावे
4. रेस्तराँमध्ये प्रवेश करताना असलेल्या रांगेसाठी 6 फूट अंतराचे पालन करणे आवश्यक
धार्मिक स्थळांसाठी गाईडलाईन्स
1. धार्मिक स्थळात प्रवेश करताना थर्मल स्क्रिनिंग अत्यावश्यक
2.कोरोनासदृश्य लक्षणे नसलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येईल
3.मास्क नसलेल्या भाविकांना प्रवेश नाही
4.कोरोनाचे नियमांचे पालन करण्यास सांगणारे पोस्टर मुख्य ठिकाणी लावणे गरजेचं