मुंबई : मुंबईतल्या भांडुप येथील ड्रीम मॉलमधील सनराइज रुग्णालयाला रात्री भीषण आग लागली. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या दुर्घटनेत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरू होते. यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण होते. दरम्यान विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये काल रात्री (गुरूवार) 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. तब्बल 11 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. परंतु या आगीत कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीच्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
भांडूपमधील अग्नितांडवात 61 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रुग्णालयात आग लागली तेव्हा 76 रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. मात्र नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सनराईज रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, जे रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, आधीच कोव्हिड उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे फॉर्मलिटीज काम बाकी होते. त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेंव्हा आलर्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
Two casualties have been reported in fire incident. Rescue operation for 76 patients admitted to COVID care hospital is underway. Level-3 or level-4 fire broke out on first floor of a mall at 12.30 AM. Around 23 fire tenders present at the spot: DCP Prashant Kadam #Mumbai pic.twitter.com/lVJ4zMRvX9
— ANI (@ANI) March 25, 2021
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
* मुंबईच्या महापौर घटनास्थळी
भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच बचाव कार्य गेल्या सहा तासांपासून सुरु आहे. ही आग प्रथमतः पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली.
“एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं मी प्रथमच पाहते आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.”
किशोरी पेडणेकर – महापौर