मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट 3 एप्रिलपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट प्रिंट करून महाविद्यालय, शाळांनी द्यायचे आहेत. त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. हॉल तिकीटमध्ये कुठलीही दुरुस्ती असल्यास ते करुन घेता येणार आहे. www.mahasscboard.in याठिकाणी ऑनलाइन हॉलतिकीट मिळतील.
कोरोनामुळे शिक्षण विभागात विद्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे 2021 मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेश पत्र (हॉल तिकीट) येत्या 3 एप्रिलपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल पासून सुरू केल्या जाणार आहेत. या परीक्षांसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून द्यायची आहे.
* 12 वी- हॉलतिकीटबाबत मंडळाच्या सूचना
– सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत
– प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये – फोटो, सही, नाव यासंदर्भात दुरूस्ती असल्यास महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत
– विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावी
– हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने Duplicate असा शेरा द्यावा