मुंबई : सध्या कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट असून ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णपणे पेलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात विरोधक सतत मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना सुणावलं आहे. पत्नी रुग्णालयात, मुलाचा कोरोनाशी लढा, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत. कोरोना परिस्थितीवरून टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं, हे अवघड आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत..
त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2021
जितेंद्र आव्हाड यांनी आज शनिवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भक्कमपणे पाठराखण केली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र उत्तमपणे सांभाळत आहेत. एकीकडे मृत्यू आणि दुसरीकडे लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न, असा कैचीत मुख्यमंत्री सापडले आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे शांतपणे पर्याय मांडत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, विरोधक अशा परिस्थितीमध्येही मदत करण्याऐवजी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना आता टाळ्या वाजवण्याशिवाय काय काम उरलं आहे. सरकार आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधक करतात. पण आता विरोधकांना दाबायला वेळ कुठे आहे. तुम्हाला दाबायचे का कोरोनाला दाबायचे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.