मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का?, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, राज ठाकरे मास्क न लावताच अनेक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही, तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच, सरकारवर टीका करणाऱ्यांचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मास्क न लावण्यात कसलं शौर्य?, असे म्हणत राज ठाकरेंना लक्ष्य केलं.लॉकडाऊन करु नका, असे म्हणणाऱ्या विरोधकांना आणि सल्ले देणाऱ्या उद्योजकांनाही मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमधून टोला लगावला आहे.
ठाकरे बंधू, एकमेकांशी संवाद करताना, या फोटोला काय कॅप्शन द्याल? #surajyadigital #राजठाकरे #उद्धवठाकरे #सुराज्यडिजिटल #RajThackeray #UddhavThackeray #संवाद pic.twitter.com/EnQE8SJFFm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
दोन दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाच्या आनंद महिंद्रा यांनी राज्यातील ठाकरे सरकारला लॉकडाऊनबाबत एक ट्विट करत सल्ला दिला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता नुसते सल्ले देण्याचे ‘उद्योग’ नका करू, ५० डॉक्टर्स पण द्या, असे म्हणत त्यांना टोला लगावला आहे. तर, मास्क न वापरणाऱ्यांवरही जबरी प्रहार केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. त्यानंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही बोलणार, आता तुम्हीही ऐका.. किंबहुना ऐकाच… असे म्हटलंय