अक्कलकोट : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे मंदीर आज पुन्हा एकदा बंद करण्यात आले. घरीच राहून स्वामी समर्थांची आराधना करावी, असे आवाहन मंदिर विश्वस्ताने केली आहे.
सोलापुरात उद्यापासून लॉकडाऊनसारखीच परिस्थिती, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद
https://t.co/v4E34vaIeU— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
वटवृक्ष मंदिरात रोज स्वामींच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये मुंबई, पुण्यासह, नगर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. त्याच प्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश तसेच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात.या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला, राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपुरातूनhttps://t.co/6lSBM4ZfzM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
कोरोना संसर्गाला आळा घालण्याच्या दृष्टीने मंदिरात गर्दी होवू नये, याकरिता आज सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मंदीर समितीस प्राप्त झाले. नंतर आज रात्री ८ ते ३० एप्रिल २०२१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत वटवृक्ष मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
* स्वामींचा प्रकटदिन होणार
दरम्यान मंदिरातील नियमित धार्मिक विधी, पूजा, आरती आदी धार्मिक उपक्रम नियमित पार पडणार आहेत. मात्र भाविकांना पूर्णपणे दर्शन बंद केले आहे. त्याचबरोबर बुधवारी ( ता.१४ एप्रिल ) श्री स्वामी समर्थांचे प्रकटदिन असून सालाबादप्रमाणे प्रकटदिनानिमित्त होणारे धार्मिक उपक्रम हे मंदिरातच समितीचे पुजारी व विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. कोणत्याही भाविकांचा त्यात सहभाग राहणार नाही.