सोलापूर / मंगळवेढा : महाविकास आघाडीचे दळभद्री व पांढऱ्या पायाचे सरकार त्यांच्यामुळेच कोरोना आला, असे गंभीर वक्तव्य आमदार प्रशांत परिचारक यांनी केले आहे. मात्र दोन तारखेला या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी होणार आहे. शिवाय, कोरोना आणि राज्यातील सरकारसुद्धा जाणार आहे, हे लिहून ठेवा, असा दावा भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केला.
अक्कलकोट स्वामी समर्थांचे पुन्हा 'देऊळबंद', प्रशासनाच्या आदेशान्वये मंदिर बंद करण्याचा निर्णयhttps://t.co/GUZKWIrFhs
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
आमदार परिचारक हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते. आ. परिचारक म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लॉकडाऊन करत आहेत, त्यांनी हा शब्द वापरला की, शेतीमालाचे भाव पडतात, त्यांचे फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी हेच सुरू आहे, त्यांना स्वतःचे कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य कसे चालवणार?, असा टोमणाही मारला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात उद्यापासून लॉकडाऊनसारखीच परिस्थिती, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद
https://t.co/v4E34vaIeU— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार हे दळभद्री आणि पांढऱ्या पायाचे सरकार असल्याचा आरोप करत त्यांच्या मुळेच महाराष्ट्रात कोरोना आला आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली. परंतु ही परिस्थिती बदलण्याची वेळ आता आली असून ही निवडणूक राज्यात बदलाची नांदी ठरेल, असे परिचारक म्हणाले.
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
* राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपुरातून
विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत विजयदादा बाहेरचे आणि मी भूमिपुत्र हा मुद्दा रेटला गेला.विधानसभेच्या तीन निवडणुकीतील आमदार भारत भालके यांचे जनमत घसरत चालले आहे. मात्र, दीड लाख मतदार त्यांच्या विरोधात झालले आहे. प्रत्येक वेळी 33 टक्के मत पडलेला उमेदवार पास होतो आणि 67 टक्के मते पडलेला उमेदवार नापास होतो, त्यामुळे या निवडणुकीत दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली जात आहे.
राज्यातील परिवर्तनाला सुरुवात पंढरपूर मतदारसंघातून होणार आहे, त्यामुळे जनतेने विकासाच्या दृष्टीने समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवणे आवश्यक आहे. ही लढाई महाविकास विकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप अशी आहे. राज्यातील एकमेव निवडणूक असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.