पुणे : येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पाऊस, तर अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी येथे अवकाळी पावसाची शक्यता-रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा,यवतमाळ या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
विदर्भात पुढील दोन तासात विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूच्या अंतर्गत भागापर्यंत उत्तर -दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता दक्षिण पश्चिम मध्य प्रदेश व लगतचा भाग ते कॉमोरीन क्षेत्र व लगतच्या भागापर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळमार्गे पसरले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह दक्षिणेतील अनेक राज्यात अवकाळी पावसाचे संकट आले आहे.
लॉकडाऊनला विरोध; उदयनराजेंचे 'भीक मांगो' आंदोलन, एका खासदाराचे अनोखे आंदोलन तर दुसरे शेतकामात व्यस्तhttps://t.co/qOfKWr6AXG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचे राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४१.९ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात राज्यात सर्व ठिकाणी आकाश ढगाळ होते. सायंकाळी साउेपाच वाजेपर्यंत सातारा १३, महाबळेश्वर १, ब्रम्हपुरी १० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
लॉकडाऊन करायची वेळ आलीय – उद्धव ठाकरे https://t.co/1YcaLdVpo5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वार्यासह पुढील ४ दिवस पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मेघगर्जनेसह सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. सायंकाळी आकाशात ढगांची गर्दी केली. त्यानंतर दुपारी ४ नंतर शहराच्या अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाली. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर गर्दी नसल्याने लोकांची धावपळ झाली नाही. अनेकांनी या पावसाचा घरात बसूनच आनंद लुटला. पुढील ६ दिवस आकाश ढगाळ राहून सायंकाळनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.