मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा रूग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांना पोटाचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा दाखल करण्यात आले आहे. उद्या सोमवारी त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, पवार यांना याआधीही रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. जे.जे रुग्णालयातील एक टीम शरद पवार यांच्या घरी कोरोना लसीचा डोस देण्यासाठी आले होते. यानंतर शरद पवार विश्रांती घेत असतानाही त्यांनी राज्यातील घडामोडींचा आढावा घेतला होता. शरद पवार यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन करण्याचेही आवाहन राज्यातील जनतेला केले होते.
लॉकडाऊन करायची वेळ आलीय – उद्धव ठाकरे https://t.co/1YcaLdVpo5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यावर १० दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शरद पवार यांना पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास असल्यामुळे त्यांना ३० मार्चला ब्रीच कँडी रुग्णालात दाखल करण्यात आले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या पित्ताशयातील खडा काढल्यानंतर त्यांना ३ एप्रिल रोजी घरी सोडण्यात आले होते. उद्या शरद पवार यांचे पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मागील शस्त्रक्रिया झाल्यापासून शरद पवार घरीच विश्रांती घेत होते यानंतर आता पुन्हा शस्त्रक्रियेसाठी आज रुग्णालयात दाखल झाले आहेत.
पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा अंदाज, ६ दिवस राहणार आकाश ढगाळ https://t.co/Z4wFgzCXY6
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. तपासादरम्यान त्यांना पित्ताशयाच्या खड्याचा त्रास होत असल्याचे अहवालात समोर आले होते. यानंतर त्यांच्या पित्ताशयाच्या खड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेच्या १० ते १२ दिवसांनंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.
पहिली शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार यांना विश्रांतीची गरज असल्याने १२ दिवसांनी पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. मायादेव यांच्या नेतृत्वात वरिष्ठ डॉक्टरांची टीम शरद पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करणार आहे. पित्ताशयाचे खडे काढण्याची शस्त्रक्रिया ही याच डॉक्टरांच्या टीमने केले होते.