मुंबई : चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्याची तुफान चर्चा आहे. गुरूसमोर शिष्य पहिल्या सामन्यात जिंकला. युवा जोश असलेला दिल्ली कॅपिटल्स संघानं CSKवर विजय मिळवला. CSK संघाने 189 धावांचं लक्ष्य दिलं असताना दिल्लीनं 190 धावा पूर्ण केल्या. महेंद्र सिंह धोनी आणि CSK संघासाठी देखील पहिला सामना पराभूत झाल्यानं वाईट वाटलं.
धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन #dharmveer #sanbhajimaharaj #surajyadigital #अभिवादन #सुराज्यडिजिटल #संभाजीमहाराज pic.twitter.com/wg1VkyO9wq
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
पराभवानंतर CSK संघाला मोठा दणका बसला आहे. IPLसाठी BCCIनं दिलेल्या नव्या नियमाचं उल्लंघन केल्या प्रकरणी कर्णधार धोनीला 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिल्ली विरूद्ध स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
BCCI च्या नव्या नियमानुसार प्रत्येक संघाला 90 मिनिटं सामना खेळण्यासाठी देण्यात आली आहेत. त्यानिमानुसार प्रत्येक ओव्हरला देखील ठरवून दिलेला वेळ आहे. प्रत्येक संघाने आपले 20 ओव्हर 90 मिनिटांत पूर्ण करणं अपेक्षित आहे. 90 मिनिटांत संघांना अडीच मिनिटांत दोनदा वेळ मिळेल. म्हणजेच संघांना 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर खेळावे लागतील. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.11 ओव्हरमध्ये खेळणं बंधनकारक आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रूग्णालयात दाखल
https://t.co/piKJ7hVsdG— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
या नव्या नियमाचं CSK संघाकडून पहिल्याच सामन्यात उल्लंघन झालं. त्याचा फटका संघाला बसला असून कर्णधार धोनीला 12 लाख रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी धोनीच्या संघाला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज IPLच्या चौदाव्या हंगामातील तिसरा सामना होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायझर्स सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
Tough game but happy to be on the winning side. #playbold@RCBTweets pic.twitter.com/3UNhRunXDO
— Virat Kohli (@imVkohli) April 9, 2021
* दोन खेळाडूंना दुखापत
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यातच आतापर्यंत दोन खेळाडू जखमी झाले आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाली. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याआधी इशांत शर्मा देखील जखमी असल्यानं तो संघात खेळू शकला नाही.
* IPL2021: दिल्ली कॅपिटल्सचा चेन्नई सुपर किंग्सवर एकतर्फी विजय
IPL 2021 च्या 10 एप्रिलला झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सनी मात केली. चेन्नईने दिलेले 189 आव्हान दिल्लीने 18.4 षटकांतच पूर्ण केले. दिल्लीकडून शिखर धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या. यात 2 षटकार व 10 चौकारांचा समावेश आहे. तसेच पृथ्वी शॉनेही 38 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांच्या साह्याने 72 धावा कुटल्या. शॉ- धवन जोडीने 138 धावांची सलामी दिली. चेन्नईकडून सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या.