अबूधाबी : कियारा कौर नावाच्या एका भारतीय-अमेरिकन मुलीने स्वतःच्या कौशल्याने दोन जागतिक विक्रम नोंदवले आहेत. ही मुलगी 105 मिनिटांत 36 पुस्तके वाचते. यामुळे तिचे लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे. कियारा अवघ्या 5 वर्षाची असून ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहते. तिचे टॅलेन्ट पाहून लोक तिला ‘वंडर चाइल्ड’ या नावाने बोलवू लागले आहेत.
गुढीपाडव्यासाठी राज्य सरकारची नियमावली, गुढी पाडव्याचे कृषी विषयक महत्त्व https://t.co/yk09n9GGJr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
अनेक पालकांकडून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. वाचन हा आपला चांगला मित्र असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. वाचनाच्याबाबतीत एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या पाच वर्षाच्या कियारा कौरची सध्या चर्चा सुरू आहे. तिची पुस्तकांसोबत इतकी चांगली मैत्री झाली की, तिच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. किआराने न थांबता १०५ मिनिटे म्हणजे जवळपास दोन तासांत ३६ पुस्तके वाचली. कियारा ही सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये वास्तव्यास आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जवळपास दोन तासांच्या कालावधीत इतकी पुस्तके वाचण्याचा विक्रम लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आला आहे. किआराला अतिशय लहान वयात वाचनाची सवय लागली होती. घरासह, प्रवासात ती कायम पुस्तके वाचत होती. तिच्या शाळेतील शिक्षिकेने तिच्या वाचनाचे कौतुक केले.
पत्नीला झुरळांची भीती वाटते म्हणून पतीने मागितला घटस्फोट https://t.co/fagnRDcoJ0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
कियाराला वाचनाची सवय तिच्या आजोबांमुळे लागली. कियाराच्या आईने सांगितले की, कियारा बराच वेळ व्हॉट्सॲपवर आजोबांकडून गोष्ट ऐकत असते. त्याचा कियारावर चांगला परिणाम झाला. मोठे होऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न असून विक्रमात नोंद झाल्यामुळे कियाराचे पालक खूष आहेत.
“पुस्तके वाचणे हा आनंददायी अनुभव आहे. पुस्तके कुठेही वाचू शकतो, विविध रंगीत छायाचित्रे असलेली पुस्तके वाचावयास आवडतात, सिंड्रेला, एलिस इन वंडरलँड्स ही पुस्तके खूप आवडतात”
– कियारा