मुंबई : कोरोना संकटामुळे अनेक सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्यातच आता गुढीपाडव्याच्या सणानिमित्तानं राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करा, असं सांगण्यात आलंय. तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असंही सांगण्यात आलंय.
बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रात दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/p8PMUUVZtv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
राज्य सरकारने गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली प्रसिद्द केली आहे. नियमांचं पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. नियमावलीनुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणं अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा विचार करत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सध्या राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार लोकांना मास्क लावण्याचं तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केल आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडवा सणावरदेखील करोनाचं सावट असून ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा – देवेंद्र फडणवीस https://t.co/fcvUlrP4wX
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोनेखरेदी केली जाते, परंतु करोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पाया पडतो, लॉकडाऊन नको; अन्यथा औषध पिणार #surajyadigital #lockdown #लॉकडाऊन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/GhmdTcwoBu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
गुढी पाडव्याचे कृषी विषयक महत्त्व जाणून घ्या – उद्या गुढी पाडवा आहे. मराठी नवीन वर्ष सुरु होत आहे. या नववर्षाचे लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्य बीज पेरतो, नववर्षामुळे भूमी सुफलित होते. यावेळी सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे, असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक सांगतात.