सोलापूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यामध्ये प्रचारसभेत बोलताना मोठं विधान केलं. ‘लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे? याने काय सरकार बदलणार आहे का? मी म्हणतो सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे’, असं फडणवीस म्हणाले.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुणाळी आता शिगेला पोहोचलीय. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठं विधान केलंय. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा झाली.
बिग ब्रेकिंग : महाराष्ट्रात दहावी – बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या https://t.co/p8PMUUVZtv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत सर्वात जास्त रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रेमडेसिव्हीर वाटत आहेत. त्यांनी काय स्टॉक करुन ठेवला आहे काय? असा गंभीर सवालही फडणवीसांनी उपस्थित केलाय.
शरद पवारांची सोलापूरसाठी 75 रेमडेसिविर इंजेक्शनची मदत https://t.co/ADoHB1els8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
कोरोनाच्या काळात सभा घेण्याची वेळ आली नसती तर बरं झालं असतं. परंतू पोट निवडणूक लागली. राष्ट्रवादीचे नेते आले आणि मुक्ताफळं उधळून गेली, म्हणून आम्हाला यावं लागलं. आतापर्यंत शक्ती विभागली होती पण आता ती एकवटली असल्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. 15 वर्षांत एक पैसा दिला नाही, आता देऊ-देऊ म्हणून सांगत आहेत. गरीबांचे मिटर कट करुन 5-5 हजार रुपये गोळा केले. हे सरकार तयार झालं तेव्हा महाविकास आघाडी म्हणून ओळखलं जात होतं. पण आता ते महावसुली आघाडी सरकार म्हणून ओळखलं जातं, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.