मुंबई : महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केले आहे. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
📢 Imp Announcement: Given the current #COVID-19 situation in Maharashtra, we’ve postponed state board exams for class 10th & 12th. The present circumstances are not conducive for holding exams. Your health is our priority. #PariskhaPeCharcha #HSC #SSC #exams (1/5) pic.twitter.com/cjeRZAT7ux
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) April 12, 2021
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अशावेळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
* दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार
महाराष्ट्रात दहावीची या महिन्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा जून महिन्यात होणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये दहावीची परीक्षा जूनमध्ये घेण्याचा निर्णय झाला आहे.
* बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होणार
कोरोनामुळे महाराष्ट्रात बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा या महिन्यात होणार होती. मात्र आता मे महिन्याच्या शेवटी बारावीची परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.