नवी दिल्ली : जगभरात घटस्फोटाची प्रकरणे वाढली आहेत. त्यातही त्याची कारणेही काही विचित्र असतात. मध्य प्रदेशमधील एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीला झुरळांची भीती वाटते म्हणून घटस्फोट मागितला आहे. पत्नीच्या झुरळांच्या भीतीमुळे त्याला तीन वर्षात १८ घरे बदलावी लागली. तिला मानसोपचार तज्ज्ञांकडेही दाखवले. परंतू ती उपचार घ्यायला तयार नाही. तिच्या भीतीमुळे पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे.
मुंबईतील पीएसआय मोहन दगडे यांचे कोरोनामुळे निधन https://t.co/KU4lwlEpB7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
नेहमीच जगभरातून घटस्फोटाची अशी विचित्र कारणे समोर येत असतात की, विश्वास बसत नाही. असंच एक घटस्फोटाच विचित्र आणि हसू येणारं कारण मध्य प्रदेशच्या भोपाळमधून समोर आलं आहे. झुरळाची भीती बऱ्याच लोकांना वाटत असते. मात्र, हेच झुरळ एका कपलच्या घटस्फोटाचं कारण ठरत आहे.
केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांना कोरोनाची लागण #corona #surajyadigital #लागण #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/rW0sc9I7oc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरूणाचं नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न झालं होतं. सुरूवातीला तर सगळं काही ठीक होतं. पण काही महिन्यांनंतर एक दिवस पत्नीने किचनमध्ये झुरळ पाहिलं. ती इतक्या जोरात ओरडली की, घरातील लोक घाबरले. यानंतर पत्नीने घर बदलण्याचा हट्ट सुरू केला. त्यांनी घर तर बदललं पण पत्नीला झुरळाची वाटणारी भीती काही कमी नाही.
गाद्या भरण्यासाठी चक्क वापरुन फेकलेल्या 'मास्क'चा वापर https://t.co/IRSaX9l4Og
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पत्नी झुरळाला घाबरते म्हणून इथे एका पतीला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे. महिलेला झुरळाची भीती वाटत असल्याने या कपलने तीन वर्षात १८ घरे बदलली आहेत. मात्र, परिस्थिती बदलत नसल्याचे पाहून आता पतीने घटस्फोटाची मागणी केली आहे.
उस्मानाबादेत सलून चालकाची आत्महत्या, धक्कादायक सुसाईड नोट https://t.co/poGrCH0uM7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
तरूणाने आपल्या पत्नीला अनेक मानसोपचार तज्ज्ञांनाही दाखवलं. मात्र, पत्नी काही औषधं खायला तयार नाही. पत्नीचा आरोप आहे की, तिची समस्या समजून घेतली जात नाहीये आणि तिला वेडी घोषित करण्याचा प्रयत्न होत आहे.
पतीने पत्नीच्या या भीतीला वैतागून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. ज्यानंतर हे प्रकरण भाई वेलफेअर सोसायटीमध्ये गेलं. सोसायटीच्या लोकांनी सांगितले की, हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही. सध्या जोडप्याचे समुपदेशन केले जात आहे.