मुंबई : कोरोना संकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली. रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आदीबाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. यासाठी निधी कमी पडू दिले जाणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
अनिल देशमुखांना सीबीआयचे समन्स, दोन पीएची केली चौकशी https://t.co/gilK90Grc5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याची घोषणा केली आहे. राज्यात रेमडेसीवीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल,जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडेसिवीर आदीबाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा – देवेंद्र फडणवीस https://t.co/fcvUlrP4wX
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजूरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही अजित पवार यांनी केली. राज्यातील कोरोनास्थिती व प्रतिबंधक उपयायोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.