मुंबई : सचिन वाझे खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने तब्बल साडे आठ तास चौकशी केली. सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख सकाळी 10 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास ही चौकशी चालली. त्यानंतर देशमुख निवासस्थानी परतले.
रेमडेसिविर इंजेक्शनकरिता चिठ्ठी घेऊन फिरु नका, थेट रुग्णालयातच मिळणार https://t.co/i2xYpfqZIr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
सचिन वाझे खंडणीप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी संपली आहे. सीबीआयने तब्बल साडेआठ तास त्यांची चौकशी केली. यावेळी सीबीआयने त्यांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारल्याचं सांगितलं जातं. मात्र, देशमुख यांनी यावर काहीही भाष्य न केल्याने देशमुख यांना नेमकं काय विचारलं गेलं? याबाबतचं गूढ वाढलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी केली.
दरम्यान, सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह आणि भन्नाट कमेंट्स https://t.co/8wGflL5vjw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने याप्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश देतानाच 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.