मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंगळवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हदरम्यान अनेक चित्रविचित्र कमेंट्स पाहायला मिळाल्या.
सर नका लावू लॉकडाऊन, माझं प्रीवेडिंग शूट करायचं आहे, शनिवार-रविवारी लॉकडाऊन ठेवू नका, आम्ही ट्रेक प्लॅन केला आहे, हॉटेल बंद करा, माझा वाढदिवस जवळ येतोय, लॉकडाऊन नको प्लीज सर माझा साखरपुडा आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या.
अवकाळी पावसाची हजेरी, बळीराजाच्या संकटात आणखी भर https://t.co/pnuqp1YetE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
१४ एप्रिल ते १ मे या कालावधीत राज्यांत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊन मी म्हणणार नाही, पण कडक निर्बंध म्हणत नियमावलींची घोषणा केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, याच वेळी दुसरीकडे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातीळ सामना सुरु होता. त्यांच्या या Live भाषणात लोकं कमेंट बॉक्समध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्याचे अपडेट्स विचारताना दिसले. आयपीएलची क्रेझ लोकांमध्ये खुप आहे हे इथे दिसले.
महाराष्ट्रात उद्यापासून १५ दिवस कडक संचारबंदी, ऐका मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून नियमावली, आणि नियोजन #surajyadigital #संचारबंदी #मुख्यमंत्री #ठाकरे #संवाद #गुढीपाडवा #नववर्ष #remadisiver #रेमडीसीवर #सुराज्यडिजिटल #CM #CMOMaharashtrahttps://t.co/jIM4skmrnu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी जाहीर केली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हदरम्यान अनेक चित्रविचित्र कमेंट्सही पाहायला मिळाल्या. माझा साखरपुडा आहे, इथपासून माझा वाढदिवस असल्याने पार्टी टाळण्यासाठी हॉटेल बंद करा, अशा भन्नाट मागण्या नेटिझन्सनी केल्या.