सोलापूर : काल मंगळवारी व बुधवारी हवामान विभागानं राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना, व विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. विविध ठिकाणी निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळं हा पाऊस पडेल, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं होतं. आज सोलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाच्या संकटात आणखी भर पडली आहे.
रमजान महिन्यात रोजा कसे ठेवतात, कधीपासून ही परंपरा! जाणून घ्या #ramdan #रमजान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #परंपरा pic.twitter.com/e943FAl200
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
सोलापूर जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदारी हजेरी लावली आहे. शहर व परिसरात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.
सोलापूर शहर तापमान ४१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा सामना करत आहेत. अंगाची लाही करणाऱ्या या उन्हात अवकाळी पावसानं जोर धरल्यानं नागरिकांचीही धावपळ उडाली होती. तर, या पावसामुळं सर्दी – पडसे होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. एकीकडे करोनाचे वाढते संक्रमण आणि अवकाळी पाऊस या दुहेरी संकटामुळं सामान्य नागरिकांबरोबरच बळीराजाच्या चिंता अधिक वाढली आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या शेतीविषयी दूरदृष्टी विचार… (ब्लॉग)https://t.co/eIK3awUHhn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी आणि काल मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. एकीकडे करोनामुळे हैराण तर दुसरीकडे अवकाळीचा दणका बसल्यामुळे बळीराजा पुरता बेजार झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तब्बल दोन तास वादळी वारे,विजेचा कडकडाट व गारांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा झोडपून काढले. सोलापूर शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून पडली त्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित करावा लागल्यामुळे शहरवासीयांना अंधारात रहावे लागले.
* जिल्ह्यात पावसाची नासाडी
तर ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे उत्तर सोलापूरसह पंढरपूर तालुक्यातील बाभळगाव परिसरातील द्राक्षे, केळी आणि पपई बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी सोलर प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हवेमध्ये अचानक बदल होऊन ढगाळ हवामान तयार होत गार वारे वाहण्यास सुरुवात झाली तर मार्डी, वडाळा, नान्नज, कारंबा, गुळवंची व इतर गावांमध्ये वाऱ्याच्या वेगासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या राशी सुरू असल्याने धांदल उडाली.
कडक संचारबंदीतही शेतमाल वाहतूक राहणार सुरु https://t.co/i3OE53Hh3W
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
* द्राक्ष, डाळिंब, आंब्याचे नुकसान
द्राक्ष, डाळिंब,आंबा, तर कांदा पिकासह फळबागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काढून पडलेल्या ज्वारीच्या कणसात पावसाचे पाणी साचल्याने ज्वारीचे दाणे काळे पडून कडबा ही काळा पडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तर काढणीला आलेला गव्हाचे नुकसान होणार आहे. अवकाळी पावसाचे पाणी काढणीला आलेल्या द्राक्ष घडात साचल्यास बुरशी पकडते. तर ऊन वाढल्यानंतर द्राक्ष मण्यांना तडे जातात. तडे गेलेल्या द्राक्ष मण्यात साखरेचे प्रमाण असल्याने मधमाशा व (सधी)माशाचा वावर वाढून द्राक्ष घडांचा उग्र वास व येतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी केली बंद
द्राक्षाचे सध्या दर वाढत असताना चार ते पाच दिवस झाले ढगाळ हवामान तयार होत आहे. तर रविवारी दुपारी ही पावसाने हजेरी लावली होती. शनिवारी रविवारी कडक संचार बंदी असल्याने द्राक्ष व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदी बंद ठेवली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही चिंता वाढत असून अवकाळी पावसाने कांदा सडण्याची भीती शेतकऱ्यात आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून द्राक्ष उत्पादक शेतकरी व ज्वारी गहू उत्पादक चिंतेत आहेत. राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू असल्याने द्राक्ष व्यापाऱ्यांनी द्राक्षाची खरेदीही बंद ठेवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.
'केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांचीच राज्य सरकारकडून पॅकेज म्हणून घोषणा' https://t.co/8xMVmA1qfV
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
१६ फेब्रुवारीपासून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. द्राक्षाचे दरही कमी होत चालले आहेत. या सह ज्वारी, गहू, हरभरा रब्बी पिकांचे नुकसान होत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बुधवारी रात्री वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान आले होते तर विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहरसह, कोंडी, नान्नज, वडाळा, पडसाळी, कारंबा व इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने खरीप व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे द्राक्षाची (पिक)छाटणी ही उशिराने झाली होती. द्राक्ष वेलीवर डाऊनी, करपा, भुरी रोगाची लागण होऊ नये याकरिता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी द्राक्ष बागेवर केली आहे. काही द्राक्ष बागेत द्राक्षाच्या घडात पाणी भरत आहे तर अनेक द्राक्ष बागेतील द्राक्ष घड काढणीला आली आहेत. अवकाळी पाऊस पडल्यावर द्राक्षे घडामध्ये पाणी साचून काढणीला आलेल्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पुढील दोन तासात धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे आणि साता-यात अवकाळी पाऊस #rain #surajyadigital #पाऊस #अवकाळी pic.twitter.com/A5BwPuCmYU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
* पुढील दोन तासांत धुवांधार कोसळणार
मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानाची स्थिती कायम राहणार आहे. त्यातच आता पुढील दोन तासात धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळणार आहेत, अशा इशारा मुंबई वेधशाळेनं दिला आहे. तसे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक असल्याचंही सांगण्यात आलंय.