Surajya Digital

“हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी”

“हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी”

मुंबई : कुंभमेळ्यातील गर्दीवरून बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी टीका केली आहे. हा फोटो कुंभमेळ्याचा नाहीतर कोरोनाचा ॲटम बॉम्ब आहे. यासाठी कोणाला जबाबदार धरणार आहोत. 2020 मध्ये मुस्लीम धर्मीयांना कोरोनाबाबत काही माहित नसताना एकत्र आले होते. कोरोनाबाबत माहित असतानाही कुंभमेळ्यात इतकी गर्दी केली होती. त्यावेळी केलेल्या टीकेसाठी हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/1382577264722726913?s=20

आता कुंभमेळ्याच्या निमित्तानं सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजतील अन् कोरोनाचा टाईम बॉम्ब फुटेल अशी भीती प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केली आहे. शिवाय हिंदूंनी यासाठी मुस्लीम धर्मीयांची माफी देखील मागावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“तुम्ही जो फोटो पाहताय तो कुंभ मेळा नाही तर कोरोनाचा अॅटमबॉम्ब आहे. या एक्सप्लोजनसाठी आपण कोणाला जबाबदार धरणार आहोत. 2020 मध्ये जेव्हा मुस्लीम धर्मीय एकत्र आले होते तेव्हा कोरोनाबाबत त्यांना काहीच माहित नव्हतं. अन् कोरोनाबाबत माहित असताना देखील कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदूंनी इतकी गर्दी केली होती. त्यावेळी केलेल्या टीकेसाठी हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागायला हवी.”

https://twitter.com/RGVzoomin/status/1382582852475232257?s=20

अशा आशयाची तीन ट्विट्स करुन राम गोपाल वर्मा यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर भाष्य केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles