नवी दिल्ली : मुळची अमेरिकेची असणारी सिटीबँक भारतातून त्यांचा व्यवसाय गुंडाळण्याची तयारी करत आहे. सिटी बँक भारत आणि चीनसह एकूण 13 देशांमध्ये कन्झ्युमर बिझनेस बँकिंग बंद करणार आहेत. ग्लोबल स्ट्रॅटजीचा एक भाग म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सिटीबँकेच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात.
ज्या इतर देशांमध्ये सिटी बँक आपला व्यवसाय बंद करीत आहे, त्यात ऑस्ट्रेलिया, बहरिन, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, फिलिपिन्स, पोलंड, रशिया, तैवान, थायलंड आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
भयंकर ! पुन्हा 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण https://t.co/KEz2qc0dqp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
भारतीय बाजारपेठेत रिटेल बँकिंग कंपनी सिटी बँक भारतातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. भारतात ग्राहक बँकिंग व्यवसाय बंद करणार असल्याची माहिती गुरुवारी बँकेनं दिलीय. आता हा गट 13 आंतरराष्ट्रीय ग्राहक बँकिंग मार्केटमधून बाहेर पडेल. बँकेच्या जागतिक रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. आता ही बँक संपत्ती व्यवस्थापन व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात सिटी बँकेला निव्वळ 4,912 कोटी रुपयांचा नफा झाला होता, मागील आर्थिक वर्षात व्यवसाय 4,185 कोटी रुपये होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परंतु सिंगापूर, हाँगकाँग, लंडन आणि यूएई या देशातील मार्केटमधील जागतिक ग्राहक बँकिंग व्यवसाय सिटी ग्रुप सुरूच ठेवणार आहे. तर चीन, भारत आणि अन्य 11 किरकोळ बाजारपेठांमधून हा व्यवसाय गुंडाळण्यात येणार आहे. सिटी बँकेच्या बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटीबँकच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी बँक मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करणार आहे.
मुंबईत कोरोना लस बनवण्यास मंजुरी, सीएमने मानले पीएमचे आभार https://t.co/ZREXMLtLAk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
सिटी बँकेचे मुख्य अधिकारी जेन फ्रेझर म्हणाले की, हा कंपनीच्या धोरणात्मक रणनीतीचा एक भाग आहे. या निर्णयामागील कारण म्हणजे या भागातल्या व्यावसायिक स्पर्धेत बँक कमी पडणे. यातून बाहेर पडण्याबाबत बँकेकडून अद्यापही रुपरेषा ठरवण्यात आलेली नाही. तसेच ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडण्याच्या प्रस्तावाला नियामक मान्यता आवश्यक असते. सिटी बँकेने 1902 मध्ये भारतात प्रवेश केला आणि 1985 मध्ये ग्राहक बँकिंग व्यवसायात उतरली.
फ्रेझर यांनी यंदा मार्चमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते म्हणाले की, आम्हाला मजबूत वाढीची शक्यता आहे आणि संपत्ती व्यवस्थापनात अधिक संधी मिळेल, अशी आशा आहे. पहिल्या तिमाहीत सिटी ग्रुपने 7.9 बिलियन डॉलर नफा कमाविला होता, जो बँकेच्या एका वर्षापूर्वीच्या नफ्यापेक्षा अधिक आहे. महसूल सात टक्क्यांनी घसरून 19.3 अब्ज डॉलर्सवर आला.
आयपीएल रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स विजयी https://t.co/gCuORLQT2a
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021